जाहिरात
क्रीडा

शिवनेरी वॉरियर्स ठरले अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेचे विजेते

रोमांचक अंतिम सामन्यात सिंहगड लायन्सचा पराभव, सिझन–८ यशस्वीरित्या संपन्न

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ३ फेब्रुवारी)

शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळील स्व.ना. सा. गंगूवार मैदानावर अप्पर-डिप्पर ग्रुपतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धा सिझन–८ मध्ये शिवनेरी वॉरियर्स संघाने अंतिम षटकात षटकार लगावत ऐतिहासिक विजय मिळवला. रविवार, १ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात शिवनेरी वॉरियर्सने सिंहगड लायन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले, तर सिंहगड लायन्सला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.

२४ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा सलग आठ दिवस चालली. या स्पर्धेत शिवनेरी वॉरियर्स, सिंहगड लायन्स, रायगड रॉयल्स व प्रतापगड पँथर्स अशा चार संघांनी सहभाग घेतला होता. लीग सामन्यांत पिछाडीवर असलेली शिवनेरी वॉरियर्स संघ केवळ प्रतापगड पँथर्सला हरवून उपांत्य फेरीत पोहोचली. त्यानंतर रायगड रॉयल्सवर मात करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सिंहगड लायन्सने लीग टप्प्यातच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

अंतिम सामन्यात शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उज्जैर शेख यांनी मारलेला षटकार निर्णायक ठरला आणि शिवनेरी वॉरियर्स संघाला विजेतेपद मिळवून दिले.
या स्पर्धेचा समारोप बोदली येथील समशेर खान पठाण यांच्या एनएस सेलेब्रेशन सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमनानी, माजी नगर सेवक प्रमोद पिपरे,काँग्रेसचे जेष्ठ नेते समशेर पठाण, सर्जन डॉ. यशवंत दुर्गे, अनुराग पिपरे, निखिल मंडलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंना ट्रॉफी व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या यशस्वी आयोजनासाठी अप्पर-डिप्पर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button