गडचिरोली : राज्य सरकारने जिल्ह्यात स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय निर्माण करावे!
डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ४ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर बसलेला अतिदुर्गम, उद्योग विरहित जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आरोग्य निदान हा विषय अतिशय मागासलेला आहे या जिल्ह्यातील शेकडो लोक कर्करोग निदानासाठी हजारो रुपये खर्च करून अन्य जिल्ह्यामध्ये जाऊन उपचार करतात परंतु जिल्ह्यात कर्करोग निदान करण्यासाठी कर्करोग निदान रुग्णालय नसल्याने सर्व कर्क रोगग्रस्त गोरगरीब शोषित वंचित गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना कर्करोग निदान गडचिरोली जिल्ह्यातच व्हावे.
याकरिता गडचिरोली जिल्ह्यातच स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय निर्माण व्हावे ही मागणी आहे याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली तसेच कर्करोगाचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत समाजात व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.
या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारांचीच नव्हे, तर आपल्या सामाजिक पाठबळाची आणि मानसिक आधाराचीही नितांत आवश्यकता असते. आपण सर्वजण मिळून कर्करोगमुक्त भविष्यासाठी प्रयत्नशील राहूया आणि सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा दृढ संकल्प करूया. व गडचिरोली जिल्ह्याला अधिक सक्षम व सुदृढ बनवूया असे प्रतिपादन डॉ. प्रणय खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी केले.
