महसूल कर्मचाऱ्यांच्या घाईच्या सर्व्हेक्षणामुळे,नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी राहणार वंचित

गडचिरोली (दि,२२ जुलै)
गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचे व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बहुतेक शेतकऱ्यानी धानाची नुकतीच रोवणी केलेली होती, अशा शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील रोवणे खराब झाले आहेत. ४-५ दिवस पुराचे पाणी भरून राहिल्याने शेताच्या बांधीमध्ये केवळ चिखलच राहिल्याचे चित्र दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे थानाचे परे सडल्या अवस्थेत आहेत. कष्टाचा पैसा खर्च करून शेतीमध्ये राबलेल्या शेतकऱ्याला सूरुवातीलाच पुराचा झटका बसल्याने बिचारा हवालदिल झाला आहे. शासनाने अशा पूरग्रस्त शेतीचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश सबंधित कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अत्यंत घाईने हे पंचनामे केल्या गेले. पंचनामे करतांना पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कोणतीही सूचना दिली गेली नाही त्यामुळे बहुतांश शेतकरी पंचनामे करतांना शेतावर उपस्थित राहू शकले नाहीत. केवळ ठळक व विशिष्ट ठिकाणी जाऊन सबंधित कर्मचाऱ्यांनी अंदाजे पंचनामे केले. ज्यांची वास्तवात नुकसान झाली आहे अशा शेतीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी काळजीत पडले आहेत. याबाबत सबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली परंतु दि. २० जुलै २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच शेती नुकसानीची नोंदणी करण्याची वेळ होती असे सांगण्यात आले. आणि तुम्ही तहसिलदार यांचेकडे तक्रार करा म्हणजे आम्ही झालेल्या नुकसानीची नोंद घेऊ असेही वक्तव्य महसूल कर्मचाऱ्याकडून करण्यात आले हे अजिबात योग्य नाही.
गोर-गरीब सर्वसामान्य शेतकरी तहसिलदार यांचेकडे जाण्याच्या एवजी अधिकारी लोकांनीच शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. परंतु असे झाले नाही. ईतक्या घाईने पंचनामे करून शासनाने काय साध्य केले याचेच नवल वाटते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत अशांना किमान ८-१० दिवसांची मुदत देण्यात देऊन पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल. ज्या शेतकऱ्यांची खरोखर नुकसान झाली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवणे योग्य नाही याचा गंभीरतेने पुनर्विचार करून राहिलेले पंचनामे पूर्ण करावे व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कमलकिशोर खोबरागडे गडचिरोली यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
महेंद्र गणवीर
तहसिलदार गडचिरोली..
👇👇
संबंधित तहसीलदार यांना फोन करून विचारणा केली असता कुठलीही घाई न करता पंचनामे करावयाचे आहेत व सर्वांचे पंचनामे होतील व नुकसानभरपाई सर्व शेतकऱ्यांना सर्व्हे करून मदत दिली जाईल.
