मुल (दि,२२ जुलै)
जि. प . उच्च प्राथ, शाळा हळदी, पं.स. येथे नवीन शैक्षणिक सन २०२२-२३ करिता मोबाईल ऍप द्वारे मतदान यंत्राचा वापर करून प्रत्यक्ष मतदान ज्याप्रमाणे होते, त्याप्रकारे मतदान घेऊन उमेदवारांच्या समोरिल नीळे बटन दाबून शालेय मंत्रिमंडळाचे गठन दिनांक १८ जुलै २०२२ ला करण्यात आले.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कु. खुशाली घनश्याम चलाख वर्ग ७ वा निवडून आली. उपमुख्यमंत्री म्हणून भाविक प्रमोद गावतुरे याची निवड झाली असून शालेय मंत्रिमंडळामध्ये स्नेहल ढोडरे, कु. आरुषी सातपूते, आयुष भुरसे, अर्जुन चलाख, दयांत पेंदाम, कु. दिव्या कोठारे, प्रतिक चलाख, कु. औदुंबरी बारसागडे, सुमित कोठारे व राजू कोठारे यांची निवड करण्यात आली. सर्व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
निवडणूकीचे आयोजन मैजिक बस फाउंडेशनचे शाळा सहाय्यक अधिकारी सोनम लाडे तसेच समुदाय समन्वयक श्री. सुधिर लेनगुरे यांनी केले. निवडणूकीचे नियोजन व व्यवस्थापन मुख्याध्यापक श्री. मनोज शेरकी, कु. रंजना निखाते, श्री. नामदेव गोहणे, श्री. गोविंदा सोनटक्के, आतिष उराडे, श्री. सचिन कोटरंगे यांनी केले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही प्रक्रिया समजून घेतली.
