शहीद पी.आय जनार्धन इंगोले यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात देऊळगाव माली येथे अंत्यसंस्कार.
अंतिम संस्कारासाठी उलटला अलोट जनसागर
लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
प्रति पंढपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले पीआय जनार्धन उत्तमराव इंगोले यांना दिनांक ५/६/२०२२ रोज रविवार ला देवाज्ञा झाली मृत्युसमयी त्यांचे वय ५४ वर्षाचे होते. सर्वप्रथम पुणे येथे राज्य राखीव दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज सहा जून रोजी सकाळी पाच वाजता मूळ गावी देऊळगाव माळी येथे आणण्यात आले. यावेळी गावात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे, जय जवान जय किसान या जय घोष्याणे गाव दुमदुमून गेले होते.त्यानंतर शासकीय इतमामात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी बुलढाणा पोलीस दलातील जवानांनी त्यांना सलामी दिली त्याचबरोबर मेहकर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश काळे, नायब पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर रिंढे, उमेश घुगे, अशोक घोंगे, अनिल काकडे व आदी पोलीस बांधव तसेच गजानन गारोळे, पोलीस पाटील गजानन चाळगे,सरपंच किशोर भाऊ गाभणे, कैलास राऊत, शिवशंकर मगर, राजेश मगर,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,पत्नी,भाऊ,बहीण,असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दिनांक ८/६/२०२२ रोज बुधवार ला देऊळगाव माळी येथे ठेवण्यात आलेला आहे.