गडचिरोली : जिल्ह्यात नवीन २ टस्कर हत्ती दाखल
नागरिकांनी सतर्कता बाळगावी : वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ११ मे)
जवळून फोटो, व्हिडिओ व हत्तींसोबत सेल्फी काढण्यासाठी जीव घालतात धोक्यात
महाराष्ट्रामध्ये ४ मे रोजी छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये २ नवीन टस्कर हत्ती दाखल झालेले आहे. २०२१ साली छत्तीसगढ येथून २३ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. तेव्हापासून हा कळप गडचिरोली जिल्ह्यात वावरत आहे. आता या कळपाची संख्या ३१ च्या जवळ झालेली आहे. त्यातच आता २ नवीन तस्कर हत्ती गडचिरोली जिल्ह्यात मुक्त संचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकांनी सतर्कता बाळगावी. हे हत्ती कुठेही न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी फिरतांना दिसून येत आहेत. रेखी करण्याच्या उद्देशाने फिरत असावे असा अंदाज आहे.
गडचिरीली गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला, कुरखेडा, आमिर्झा या भागात हे २ तस्कर हत्ती फिरतांना दिसून आले आहेत मिळेल त्या मार्गाने हे हत्ती मार्गक्रमण करीत आहे. काही वेळा तर हे हत्ती गावातील मुख्य मार्गावरून जाताना दिसत आहे. त्यातच लोकांनी सेल्फी व व्हिडिओ साठी या हत्तींचा पाठलाग करताना सुद्धा दिसत आहे.
(हेच ते दोन नवीन तस्कर हत्ती )
लोकांचा हा गैरसमज आहे की आपण हत्ती पेक्षा जास्त जोरात पळू शकतो. हे हत्ती रानटी असल्याने चवताळून लोकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी सेल्फीचा नाद सोडून या हत्तींचा मार्ग रोखू नये व त्यांचा पाठलाग करू नये त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावे. या अगोदर कुनघाडा वनपरिक्षेत्रात अशाच सेल्फीच्या नादात एका तरुणाला टस्कर हत्ती ने चिरडून ठार केले होते. या नंतर अशी घटना घळू नये यांची लोकांची काळजी घ्यावी. तसेच वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे.
