जाहिरात
ताज्या घडामोडीदेऊळगाव राजा

सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग २ पदावर निवड

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
देऊळगाव राजा तालुक्यातील डोईफोडे वाडी या छोटे गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा श्री दत्ता भवानी डोईफोडे यांची मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. अशा परिस्थितीमध्ये जन्मलेला हा मुलगा कष्टाळू मेहनती असल्यामुळे व त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे तो आज या पदावर आहे.
श्री डोईफोडे यांनी खेडेगावांमध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण करून देऊळगावराजा शहरामध्ये ११ वी १२ वी चे शिक्षण पूर्ण केले होते कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये देखील शिक्षण घेऊन जिद्दीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग २ च्या पदावर निवड झालेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button