जाहिरात
चंद्रपूरताज्या घडामोडी

बल्लारपुर (BILT) पेपर मिलच्या कळमना येथील निलगिरी डेपोला भीषण आग.

बल्लारपूर-कोठारी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार लोकशाही न्युज प्रतिनिधी बल्लारशाह जवळील कळमना येथील पेपर मील ला आज रविवार दिं.२२ दुपारी ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागुन करोडो रुपयाचे बांबु व निलगिरी जळुन खाक झाल्याचा प्रकार घडला.आग लागण्याचे कारण अद्याप कडु शकले नाही.माञ डेपोच्या जवळच पेट्रोलपंप होता त्याची झळ पेट्रोलपंप पर्यत पोचनार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत असतांना आगीवर नियंञण मिळविणे शक्य झाले नाही.
आणी हळुहळु आगीचा विस्तार वाढला व डेपोजवळ असलेल्या साची पेट्रोलपंपला सायंकाळी ७ वाजता आगीच्या भक्षस्थानी आला.पेट्रोल पंपावर आग लागताच त्याचा स्फोट झाला.आग इतकी भयानक होती की बल्लारपुर-कोठारी या राष्ट्रीय महामार्गावर डेपो असल्याने व आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीच्या भंयकर भिषण झळाचे लोट उसळत होते.धुराचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला असल्याने महामार्गावरील रहदारी थांबविण्यात आली होती.

भीषण आगीची माहिती मिळताच तहसीलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील, कोठारीचे ठाणेदार तुषार चौहान हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. आगीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची ये-जा थांबवली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या गावात अंधार पसरणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button