जाहिरात
बुलढाणा

धम्मदीक्षा घेतल्या बद्दल आशाताई चरवे – खरे यांचा सत्कार.

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
सम्राट अशोक -फुले-आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने चिखली येथे बुद्ध जयंती व वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आशाताई चरवे यांचा ‘बुद्ध -भीम’ गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 16 मे 2022 रोजी बुद्धजयंती निमित्य सकाळी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. मा.न्यायाधीश सुरेशजी घोरपडे व उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष राऊत यांनी मार्गदर्शन केले. आयु.संघमित्रा कस्तुरे – वानखेडे यांनी स्वखर्चाने खीरदान केले. प्रा.मिलिंद मघाडे यांनी केले. सायंकाळी विविध ठिकाणाहून बुद्ध अनुयायांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांतता मिरवणूक काढून फुले -आंबेडकर वाटीकेत बुद्धांना अभिवादन केले. त्यानिमित्य दि.20 मे रोजी समितीने आशाताई चरवे यांचा बुद्ध -भिम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी अतिशय प्रबोधनात्मक पद्धतीने तथागत भगवान बुध्द,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवांच्या जीवनावर गीते गायली. अशाताई चरवे व त्यांचे पती हिरालाल खरे यांनी मागील वर्षी नागपूर येथे बुद्धधम्माची दीक्षा घेतली त्यानिमित्त समितीच्या वतीने त्यांचा शाल,पुष्पगुच्छ व स्मृतचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या जीवनाचे सोने झाल्याची प्रतिक्रिया आशाताई चरवे यांनी दिली. समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुभाष राऊत यांनी समितीच्या वतीने समाजातील अनिष्ट आणि कालबाह्य झालेल्या प्रथा- परंपरा यात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकाचे वाचन केले. जसे विवाह वेळेवर लावावेत, जलदान विधीच्या वेळी स्मशान भूमीत भाषणं न करता घरी करावेत व मोजक्या जवळचा संबंध असणाऱ्यांनी भाषणे करावीत, रक्षा नदी किंवा विहिरीत टाकून प्रदूषण करण्यापेक्षा शेतात किंवा परसबागेत पुरून त्यावर स्मुर्ती म्हणून वृक्षारोपण करावं, चितेवर नातेवाईकांकडून नवीन कपड्यांचा ढीग याचा अपव्यय टाळून केवळ धम्माप्रमाने श्वेतवस्त्रच टाकावे, विवाह प्रसंगी DJ किंवा भोजनातील पदार्थांची रेलचेल कमी करून वाचनालय,विहार किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अशा अनेक सुधारणेसाठी *सम्यक* *परिवर्तन संदेशाचे* वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.संघमित्रा कस्तुरे – वानखेडे,कार्याध्यक्षा यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.श्याम वाघ सर यांनी केले. कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रशांतभैया डोगरदिवे व राहुल पवार यांनी केली . तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भिसे,दयानंद निकाळजे,विशाल खरात,विलास घोरपडे, संजय ऊ.जाधव, राजेंद्र सुरडकर, अड.राजीव जाधव,प्रा.राजेंद्र गवई,विणकर बाबूजी, किशोर बोर्डे, प्रकाश साळवे, बलदेव साळवे,एन के सरदार,एस.एस गवई, डॉ.विजय साळवे,श्याम पवार, शिमाताई मिसालकर तथा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button