जाहिरात
सावली

निमगाव परिसरात वाघ, बिबट्यांचा धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करा

सरपंच गीता लाकडे यांची मागणी

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

सावली तालुक्यातील अनेक गावे वनविभागाला लागून असल्यामुळे हिंस्त्र वन्यप्राणी मुख्यतः वाघ व बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाघ व बिबट्या गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. सध्या निमगाव परिसरात वाघाची चांगलीच दहशत असून अनेकांना गावालगतच्या परिसरात वाघाचे दर्शन होत आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गीता लाकडे यांनी निवेदनातून केली आहे.
निमगाव, चक विरखल, दाबगाव, मौशी, गायडोंगरी आदी परिसराला झुडपी जंगल लागून असल्यामुळे वन्यप्राणी कोठे लपून असतात ते कळेनासे होते. विरखल गाव वन विभागाच्या कक्ष क्रमांक ४१० लगत असल्याने वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असतात. शेतकरी आपल्या शेतात गेले असताना अनेकदा शेतकऱ्यांना वाघाचे व
बिबट्याचे दर्शन होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले काम अर्ध्यावरच सोडून भयभीत होऊन घराकडे वापस यावे लागते. या वाघांचा व इतर वन्यप्राण्यांचा मोर्चा गावाकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परिसरातील लोक रात्री घराबाहेर पडत नसून रात्री ८ वाजताच सर्वत्र सुनसान
परिसरात फिरणाऱ्या वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गीता लाकडे यांनी केली आहे.

निमगाव परिसराला वैनगंगा नदीचा किनारा लागून असल्यामुळे अनेकदा सावली तालुक्यातील वनविभागातील वाघ नदी ओलांडून गडचिरोली वनविभागात जात असतात. नदीच्या काठावर झुडपी जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी डुकरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात राहत असल्याने वाघ जास्तीत जास्त नदीकडच्या दिशेने जात असतात. अनेकदा वन कर्मचाऱ्यांनाही वाघाचे दर्शन झाले आहे. या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा वाघाचे पगमार्कही दिसून आले आहे. त्यामुळे नागरिक भयभित असून या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निमगाव येथील सरपंच गीता लाकडे यांनी केली आहे.
सदर वाघ कधी रस्त्याच्या काठावर दबा धरून लपून असतो तर कधी भ्रमण करताना नागरिकांना दर्शन होत आहे. वैनगंगा नदी लागून असल्यामुळे शेतीचा हंगाम लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीकडे जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच गिता लाकडे यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button