जाहिरात
राजकीयसावली

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा व्याहाड (बु) सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी वासेकर यांचा भाजपात प्रवेश.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

सावली तालुक्यातील व्याहाड (बु) येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी वासेकर यांनी आज व्याहाड (खुर्द) येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी, जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात सहर्ष स्वागत केले.
यावेळी, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहुले, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, अर्जुन भोयर, माजी पं. स. उपसभापती रविन्द्र बोलीवार, नगरसेविका सौ. निलिमाताई सुरमवार, कविंद्र रोहणकर, कुनघाडकर सर, गणपत कोठारे यांचेसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button