जाहिरात
चंद्रपूर

लोकांना हक्काची जागा मिळावी म्हणून ॲड. हरीश मंचलवार यांचा प्रयत्न.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

चंद्रपूर शहरातील सिविल व क्रिमिनल चे प्रसिद्ध वकील ॲड. हरीश मंचलवार यांनी प्रत्येकाला समाजाचं देण लागते या भावनेतून गरिबांना हक्काची जागा मिळावी या करिता 15 वर्षा पासून नझुल जागेवर राहणाऱ्या लोकांना पट्टया च्या मोफत केसेस चे मार्गदर्शन शिबीर अनेक महिन्या पासून राबवित आहे आतापर्यंत अनेक लोकांचे पट्टयाच्या केसेस दाखल केलेले आहे.दादमहाल वॉर्ड, पठाणपुरा वॉर्ड, समाधी वॉर्ड येथे अनेक ठिकाणी बैठकी घेण्यात आले आहे, पट्टयाच्या केसेस ची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे,पट्टया च्या केसेस ला पूर्ण होण्या करिता 3-4 वर्ष लागते. ॲड. हरीश मंचलवार यांनी आता पर्यंत अंचलेश्वर वॉर्ड येथील 2लोकांना पट्टे मिळवून दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ॲड. मंचलवार याची गरिबांना पट्टे मिळवून देण्याची धडपड सुरू असुन, पट्ट्याच्या केसेसची प्रक्रिया अतिशय जटिल व लांबलचक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून तहसील कार्यालय , तालुका भूमि अभिलेख कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, नगर रचना कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय ह्या सर्व कार्यालयातून केस फिरून आल्यानंतर शेवटी जिल्हाधिकार्यालय यांचेकडून पट्टा दिला जातो. ॲड. हरीश मंचलवार यांचे कामाचे चंद्रपूर शहरांमध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button