गडचिरोली येथील स्थानिक शिवनगर येथे बुद्ध जयंती साजरी
गडचिरोली येथील स्थानिक शिवनगर येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून भोजराज कान्हेकर म्हणाले की , बुद्धाच्या काळात विषमता फार मोठ्या प्रमाणात पसरली होती. प्रचंड वर्णवाद होता. त्यामुळे सर्वसामान्य जनता दुःखी होते. बुद्धाने जनतेचे दुःख पाहिले तेव्हा त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. दुःखाचे कारण काय असावे ? म्हणून त्याच्या मनात अनेक विचार निर्माण झाले. या दुःखातून मुक्ती जनतेची केलीच पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या सुख समाधानाचा त्याग करून गृहत्याग केला . अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग मिळाला . या दुःख मुक्तीच्या मार्गात त्यांनी जनतेला चार आर्यसत्ये , आर्य अष्टांग मार्ग , दहा पारमिता अशाप्रकारे सखोल धम्माचे ज्ञान दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जनतेला उपदेश केला.दु:ख मुक्तीचा मार्ग दिला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद राऊत म्हणाले की , बुद्धाच्या काळात विद्युतची सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांनी पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात जनतेला धम्म दिला.प्रत्येक पौर्णिमेला बुद्धाविषयी अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बुद्ध धम्मात बाराही पौर्णिमेला फार महत्त्व आहे. तसेच मंगला लोणारे यांनीसुद्धा बुद्ध धम्मात स्त्रियांना फार महत्त्व आहे ,असे सांगितले . त्या म्हणाल्या की , कोणत्याही धर्मात स्त्रियांना जेवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व बुद्धाने स्त्रियांना दिले. स्त्रियांसाठी सुद्धा महिला भिक्खू संघाची निर्मिती केली . अशाप्रकारे स्त्री आणि पुरुष समानता आहेत असे बुद्धाने सांगितले.
या कार्यक्रमाला रसिका चूनारकर , घनश्याम चूनारकर , लक्ष्मण सयाम , हिरामण जेंगठे ,उर्मिला सोनवणे, दुर्गा कांबळे ,कल्पना गरमडे , संगीता भोयर, सत्यवान मेश्राम , हिरामण मेश्राम , शांताबाई टेकाम , कासाबाई भोयर, मंगला लोणारे , दुर्गे ,आदी उपासक आणि उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करण्यात आले . या कार्यक्रमाचे संचलन सुनील सहारे यांनी केले तर आभार प्रीती रामटेके यांनी मानले.
