ताज्या घडामोडी
खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गावरान कांद्याला हमीभाव दया.
लाखनवाडा वासीयांची मागणी .
अमोल भोलनकर
लाखनवाडा प्रतिनिधी
लाखनवाडा परिसरातील कांदा या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे .महागाईचे प्रमाण दिवसान दिवस जास्त प्रमाणात आहे .ज्यावेळेस शेतकऱ्याचा पिकांचा माल मार्केट येथे त्यावेळेस किमतीची घसरण होऊन जाते .जास्तीत जास्त प्रमाणे कांदा या पिकाला भरपूर प्रमाणात मजूर लागत आहे त्यामुळे सरकारने गावरान कांद्याला हमीभाव २००० ते २५०० रुपये देण्यात यावा .केंद्र सरकार व राज्य सरकार तात्काळ बैठकीत निर्णय घेण्यात यावा.त्यामुळे गावरान कांदा आयात निर्यात लवकरात लवकर सुरू करण्यात यावी .अशी मागणी लाखनवाडा परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे .
जाहिरात
