जि.प.उ.प्रा. शाळा वाघोली येथे मुख्याध्यापकाचे गैरवर्तन
शाळा व्यवस्थापन समिती ची तक्रार

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि. २० मे)
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली मधील मुख्याध्यापक पुरुषोत्तम पिपरे याने शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीच्या बैठकीतच सर्वांसमोर खर्रा खाल्याने त्या मुख्याध्यापकास निलंबित करावे अशा आशयाची तक्रार शाळा शिक्षण व्यवस्थापन समिती वाघोली यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना दि. २० जून रोजी केली आहे.
सदर मुख्याध्यापक सन २०१८ पासुन शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी २०२३-२४ या संपूर्ण शैक्षणिक वर्षात विदयार्थ्यांना हेतुपुरस्पर पुरक आहारापासून वंचित ठेवल्याची तक्रार सुद्धा त्यांनी केली आहे.
(मुख्याध्यापक पिपरे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत खर्रा खातानाचा व्हिडिओ)
वाघोली हे गावच्या चामोर्शी मुख्यालयापासून एका टोकावर वसलेले छोटेसे गाव असून गावातील विद्यार्थी व नागरिक शासकीय योजनांचा चांगला लाभ मिळेल या आशेत असतात मात्र मुख्याध्यापक पुरुषोत्तम पिपरे हे शाळेतच विद्यार्थ्यापुढे व चक्क समिती पुढे खिशातून खर्रा काढून खातात व विद्यार्थ्यांना लाभापासून हेतू परस्पर वंचित ठेवण्याचे कामही करीत आहेत.

(शाळा व्यवस्थापन समितीची तक्रार )
तक्रारीवर शेरनाथ नीलकंठ भांडेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाघोली पंचायत समिती चामोर्शी यांची स्वाक्षरी आहे. तरी अशा बेजबाबदार,निष्क्रिय, कामचुकार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करावी शाळा व्यवस्थापन समिती वाघोली ने आपल्या तक्रारीतून केली आहे.
