भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे मार्गदर्शन शिबीर संपन्न
शुभम खरवडे वडसा शहर प्रतिनिधी
मौजा देसाईगंज वडसा येथे जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यानी जनतेला प्राप्त करुन दिलेलेल्या न्याय हक्काचे ग्रामसभा,माहितीचेअधिकार ,
दप्तर दिरंगाई,रेशनिंग व्यवस्था व अन्य कायद्याची पुरेपुर जाणीव व्हावी या करीता भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतिने सर्वसामान्य जनतेच्या हिता करीता शनिवार दिनांक १४/५/ २०२२ ला एक दिवशीय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
ग्रामीण भागातील ग्रामस्थाना ग्रामसभेचे अधिकार ,माहितीचे अधिकार,दप्तर दिरंगाई रेशनिंग व्यवस्था,नागरीकांची सनद याचे सखोल अभ्यास होण्या करीता जिल्हा,तालुका स्तरीय प्रशिक्षण शिबीर घेऊन ग्रामस्थाना प्रशिक्षीत करावं लागेल आणि ही काळाची गरज आहे.तेव्हा सक्षम ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्श गाव निर्मीती करावे. असे प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे केंद्रीय सचिव अशोकजी सब्बन यानी केले.
यावेळी पंचायतराज म्हणजे काय शासकीय योजना कशा राबवायच्या महीलांचे अधिकार यावर सविस्तर मार्गदर्शन पंचायतराज ग्रामसभा अभ्यासक नामदेव घुले यानी केले.यावेळी जेष्ट समाजसेवक देवाजी तोफा डाँ शिवनाथजी कुंभारे, विजय खरवडे .यानी मार्गदर्शन केले. ग्रामसभा व माहितीच्या अधिकारावर सखोल मार्गदर्शन करुन या कार्यक्रमाचे उदघाटक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे केंद्रीय सरचिटनीस अशोक सब्बन,केंद्रीय पंचायतराज व ग्रामसभा अभ्यासक नामदेवजी घुले,राज्य समिती विश्वस्त डाँ शिवनाथ कुंभारे, जेष्ट समाजसेवक देवाजी तोफा,आदर्श ग्रामपंचायतचे मानकरी सरपंच प्रविण साठे,देसाईगंज वडसेच्या माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते ,अहेरीच्या माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे,प्रा विलास निंबोरकर ,पंडीत पुडके,सुखदेवजी वेठे,प्रा.भास्कर नरुले धनपाल कार,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे,चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अविनाश आंबेकर,महीला अध्यक्ष ज्योती कोमलवार,फुलचंद वाघाडे,सुरेश दुरुगकर,योगाजी कुडवे,फुलचंद,रविन्द्र दोनाडकर, वाघाडे,वडसा तालुकाध्यक्ष संतोष दुपारे,उपाध्यक्ष नाणाजी ठाकरे,दयाराम बन्सोड,,नवलाजी पारधी,क्रिष्णा आंबेकर,वासुदेव बुराडे,प्रविण चौधरी,यशवंत मडावी,पुंडलीक नागपूरकर,चेतन कञोजवार,ज्योत्सना पारडवार,सुनीता पिंपळशेट्टीवार,कलीम कुरेशी,येशवंत,जयप्रकाश हर्षे, आईंंचवार,राहुल उत्तरवार ,शुभम खरवडे,रामक्रिष्ण सहारे,उषा ठाकरे, पिंटू जांबुळकर,संतोष मल्यालवार,गुड्डू दुर्गे,अनिकेत खरवडे, निलीमा सिंग,चरणदास बोरकुटे,गयाबाई ठोंबरे,सिमधू ठेंगरी,सारीका कुर्जेतर,रेखाताई बुल्ले,अंजली केरकळ,अनिता धोटे,बबीता खरवडे,अश्वीनी दोनाडकर,रत्नप्रभा डोंगे,रामभाऊ धोटे,ञ्यंबक राऊत,रामभाऊ कुर्जेकर,संजय प्रधान
या सह जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीरात उपस्थित शेकडो नागरीक उपस्थित होते.यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषाच्या प्रतीमेस दिप प्रज्वलन ल माल्यार्पण करुन करण्यात आले.विशेष आकर्षण आदीवासीचे रेला नृत्य, लेझीम पथक,स्वागत सुमधूर गितानी केले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन चेतन कञोजवार यानी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तर आभार धनपाल कार यांनी मानले.
