जाहिरात
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतली भेट

शहर विकासावर चर्चा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २५ डिसेंबर)

नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भरघोस यश संपादन करून गडचिरोली च्या नगराध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रणोती सागर निंबोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील कार्यालयात सदिच्छा भेट घेत
आशीर्वाद प्राप्त केले.

या भेटीमुळे शहराच्या राजकीय व विकासात्मक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर किती सजग, सक्रिय आणि परिणामकारक नेतृत्व देत आहेत हे दिसून आले आहे.

या भेटीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर सखोल, सकारात्मक आणि ठोस चर्चा करण्यात आली.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, रोजगारनिर्मिती आणि भविष्यातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्द दिला, ही बाब शहरासाठी अत्यंत आश्वासक ठरत आहे.

या महत्त्वपूर्ण भेटीवेळी चिमूर चे आमदार कीर्ती कुमार भांगडिया,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,,गोविंद सारडा,सागर निंबोरकर, माजी आमदार नामदेव उसेंडी,माजी आमदार देवराव होळी यांची उपस्थिती होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button