गडचिरोली, दि.(७) : भामरागड तालुका हा संपुर्णपणे घनदाट जंगलाने व्याप्त तालुका असुन औद्योगिकरणापासुन कोसो दुर अंतरावर आहे. तालुक्यामध्ये विविध जातीचे वृक्ष, पक्षी, जंगली श्वापदे असुन पर्यटनाकरीता आवश्यक असलेले डोंगर-नद्यांनी व्याप्त प्रदेश आहे. निसर्गाची तालुक्यावर एवढी मेहरनजर असुन देखील तालुक्यातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या असलेले माडिया व गोंड या आदिवासी समाजाचे जीवनमान अजुनही मागास आहे. तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणे करीता तसेच बाहेरील जगाला भामरागड तालुक्यातील विविध आदिवासी संस्कृती तसेच आदिवासी समाजातील चालीरीती, लोकनृत्य येथिल पर्यटन स्थळे याबाबत माहिती होणे तसेच येथील आदिवासी नागरीकांच्या सुप्त गुणांना वाव व चालना मिळण्याकरीता तसेच आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करण्याचे उद्देशाने भव्य स्तरावर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे वतीने “माडीया सांस्कृतिक महोत्सव- २०२२” दिनांक २६ ते २८ मे २०२२ या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. या महोत्सवाचे मुख्य अतिथी मा. महामाहिम श्री भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य हे उद्घाटन करतील.
जाहिरात
