जाहिरात
चंद्रपूरनागभीड

नागभीड येथे भीषण अपघात, दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

नागभिड: चिखल परसोडी येथे घरी लग्न असल्यामुळे लग्ना करिता सामान आणायला नागभीडला जाणार्‍या युवकांच्या दुचाकीला – टिप्परने धडक दिल्यामुळे एकाच परिवारातील दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सविस्तर वृत्त, असे की घरच्या लग्नाचे कार्य असल्यामुळे लग्नाच्या कामाकरता नागभीड येथे खरेदी करायला चिखल परसोडी वरून नागभीडला मोटारसायकल क्रमांक एम. एच.३१ बी.आर.१७४७ ने जात असताना या मोटरसायकल ला, नागभीड कडून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या मालवाहू टिप्पर क्रमांक एम. एच. ४० बी.जी. ५४४१ ने समोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे भूषण शामराव बोकडे, वय २५ वर्ष, पवन विनोद बोकडे वय १७ वर्ष, हे दोन युवक जागीच ठार झाले . तर गिरीश सुधाकर बोकडे वय १८ वर्ष हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला तात्काळ नागपूरला समोरील उपचाराकरिता हलविण्यात आले. असुन चालक अपघात स्थळी टिप्पर ठेवून फरार झाला.आहे पंचनामा करून दोन्ही शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे आणन्यात आले आहे समोरील तपास नागभीड पोलिस हे करीत आहे. या अपघातामुळे चिखल परसोडी व परिसरात शोककळा पसरली असून परिवारातील संध्याकाळचा असलेला लग्न समारंभ हा शोक समारंभात बदललेला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button