भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीची मीटिंग उत्साहात साजरी.
१४/५/२०२२ ला होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी.
देसाईगंज वडसा येथे दिनांक १४/५/२०२२ ला होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराची पूर्व तयारी म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीची मीटिंग संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर सभागृह देसाईगंज येथे बोलावली होती त्या निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहील याची खात्री करून घेण्यासाठी नियोजन मीटिंग बोलावली होती , या मीटिंगला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या मीटिंगला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी आपल्या मनोगतात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सूचना देण्यात आल्या असून काही दिवस आपल्या कार्यक्रमाला उरले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करत जिल्ह्यात , तालुक्यात , गावात जाऊन लोकांना आपल्या होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेचा हित जोपासता येईल त्यांना त्यांचे अधिकार समजले पाहिजे यासाठी गावागावात जाऊन लोकांना मार्गदर्शन शिबिर याची माहिती देण्यात यावी या संदर्भात मीटिंग बोलावली होती . या नियोजन मीटिंग ला जिल्ह्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे , योगाची कुडवे , फुलचंद वाघाडे , मंगेश का मडी , संतोष दुफारे , धनपाल कार , नानाजी ठाकरे , बांगरे , प्रवीण चौधरी , नानाजी खुणे , अशोक गायकवाड , श्रीहरी गायकवाड , पुंडलिक नागपुरकर , वासुदेव बुराडे , जोत्सणा पारटवार , खरवडे ,चौधरी ,प्रभाकर सुर्यवंशी , व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते .
