जाहिरात
देसाईगंज/वडसा

आपले अधिनिस्त असलेल्या हुतात्मा स्मारकातील सोयीसुविधा सुस्थितीत पूर्ववत करा.

देसाईगंज युवक कांग्रेस ची मागणी

Spread the love

गडचिरोली जिल्हयातील एकमेव नगरी असलेल्या देसाईगंज शहरामध्ये एकुलते एक असलेले हुतात्मा स्मारक व वाचनालय देयनिय परिस्थितीत असून अखेरची घटका मोजत आहे. दरवर्षी ठेकेदारा मार्फत देखभाल व कामकरीता लाखो रुपये खर्च केले जातात. मग हा पैसा जातो कुठे ? वाचनालया मध्ये पुरेशी पुस्तके उपलब्ध नाहीत, कुलरची पुरेशी सोय नाही, बगीच्याची व झाडांची निगा व्यवस्थीत राखल्या जात नाही,लहान मुला साठी ठेवलेले साहित्य यांची वाताहात झालेली असून झुले तुटलेले आहेत. घर तुटलेले आहेत व्यायामाचे साहित्य तुटलेले आहेत. मॅटिंग गवताची निगा राखली जात नाही,असे अनेक समस्या स्मारका मध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे स्मारकात वाचक, लहान मुले वुद्ध लोकांची संख्या कमालीची घटलेली आहे. याबाबीकडे प्रशासनाने लक्ष घालुन ठेकेदाराला सुचना देवून सर्व सोयी सुविधा अद्यावत करुन देण्यात याव्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ नरोटे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकुभाऊ बावणे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष लतीप रिजवी, महिला शहर अध्यक्ष यामीना कोसरे,वासुदेव जुगनाके, नरेश लिंगायत, सुनील चिंचोळकर, अमित सलामे, भुणेश्वर निमजे उपस्तिथ होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button