जाहिरात
गडचिरोली

मारकबोडी येथे सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल

गडचिरोली,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ६ एप्रिल ते १६ एप्रिल २०२२ या दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली , बार्टी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मारकबोडी येथे सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर समाज कल्याण योजना व बार्टी च्या योजनांची महिती देण्यात आली व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. नंतर गावात अनु.जाती व नवबौद्ध वस्तीत स्वच्छता करून
समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमात राहुल गोविंदलवार,जी.एम.कांबळी, हेमंत लांजेवार, रमेश पोटे, सैलेश रामटेके, सोहेल शेख , मनिष गणवीर बार्टी प्रकल्प अधिकारी सरपंच , ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरीक , व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button