डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम आदमी पार्टी तर्फे शरबत वाटप
गडचिरोली दि १४ :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शहराच्या मुख्य इंदिरा चौकात भव्य मंडप उभारुन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प हार वाहण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शरबत वाटप करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सत्ता स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अंत्यत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत सध्या व्यवस्था परिवर्तनाची खरी गरज आहे बाबासाहेबांच्या अनुयायांनी आम आदमी पार्टीचे हात बळकट करण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचे लढ्यात सामील व्हावे व बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असे जयंती दिनी आवाहन करन्यात आले “बाबा तेरा सपना अधुरा,आम आदमी करेगी पूरा” कार्यक्रमाला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे हस्ते हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महामंत्री भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे,संघटन मंत्री डॉ.देवेंद्र मुनघाटे,शहर संयोजक रुपेश सावसाकडे, हितेंद्र गेडाम, एकनाथ गजबे,अनिल बाळेकरमकर,नामदेव पोले,कैलास शर्मा,रमेश उपल्लवार,प्रकाश सोनूले, रुपेश टेकाम ,सूरेश कोवे,भैयाजी महाजन,विनोद धकाते,संजय पून्नावार,शैलेश पिसे,किशोर देशमुख, संजय बाटबरवे,कबिर चव्हाण, हरीष वैरागडे,महेश बिके ऐ.के.पठान,आचीत ठाकूर,गणेश त्रिमुखे,सोनल न्ननावरे,अलका गजबे,समीता गेडाम,गौतम गेडाम इत्यादी कार्यकर्ता हजर होते.
