जाहिरात
गडचिरोली पोलीस

पोलीस उपविभाग कुरखेडाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने पटकाविले स्पर्धेचे अजिंक्यपद..

विजेत्या संघाचा मान्यवरांकडून सत्कार.

Spread the love

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन व मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतून ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात दिनांक ०८/०४/२०२२ पासून सुरु होती. या कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामने दिनांक ०९/०४/२०२२ रोजी पार पडले असून, कुरखेडा उपविभागाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेमध्ये उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील. १) वीर बजरंग क्लब हलवेर (भामरागड) २) गोडवाना कबड्डी संघ जिमलगट्टा ३) उडान कबड्डी क्लब संघ सिरोंचा ४) बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार ल्ली) ५) जय ठाकुरदेव क्लब परसलगोंदी (हेडरी) ६) नवयुवक क्रिडा कोरेली (बु.) अहेरी 15) महाराणा प्रताप क्लच गडचिरोली ८) एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही (धानोरा) ९) पवनपुत्र क्रिडा मंडळ विरसी (कुरखेडा) १०) जय बजरंग क्लब कारवाफा

(पेंढरी) अशा १० संघातील १२० खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला होता. या १० संघामध्ये २ दिवसांपासून पोलीस मुख्यालय मैदानावर रोमहर्षक लढती पार पडल्या. यामध्ये उपविभाग कुरखेडाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने प्रथम क्रमांक, उपविभाग हेडरीच्या जय ठाकुरदेव क्रिडा मंडळाने दुसरा क्रमांक उपविभाग धानोराच्या एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही, संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

यावेळी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला २५,०००/- रु. रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र, गोल्ड मेडल, तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला २०,०००/-रु. रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र, सिल्कर मेडल, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला १५,०००/- रु. रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडूंना प्रशस्तिपत्र व ब्राझ मेडल तर उपविभाग भामरागडच्या वीर बजरंग क्लब, हलवेर संघास उत्तेजनार्थ बक्षीस ५०००/- रु. रोख व सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ट रीडर दिपक ठाकरे पवनपुत्र क्रिडा मंडळ विरसी (कुरखेडा), उत्कृष्ट ऑलराऊंडर आशिष सोनवाणी, एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही (धानोरा), उत्कृष्ट डिफेंडर सचिन आरमा, जय ठाकुरदेव क्लब परसलगोंदी (हेडरी) या खेळाडूंना यु-मुंबाची ट्राफी व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. याबरोबरच यु-मुंबाचे टिम लिडर श्री. संदिप सिंग व यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू श्री. अभिषेक सिंह यांचा शाल श्रीफळ, मोमेटो, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. प्रणिल गिल्डा, यु-मुंबाचे टिम लिंडर श्री. संदिप सिंह, यु मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू श्री. अभिषेक सिंह यांचे हस्ते शहीद पांडु आलाम सभागृहात पार पडले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकं तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री महादेव शेलार, प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. अशोक माने व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button