जाहिरात
क्रीडा

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत तन्मय करेवार ने पटकविले सुवर्ण

Spread the love

लोकशाही न्युज, (दि. १३ जून)

दि. ९ ते ११ जून २०२५ दरम्यान शेगाव बुलढाणा येथे झालेल्या अंडर १७ ज्युनिअर मुले/मुली महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात गडचिरोली बॉक्सिंग केंद्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बॉक्सिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले.

त्यात रितेश करंगामी ४६ किलो वजन गटात सुवर्ण तर तन्मय सीमा करेवार ८० वजन गटात विजय प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले, ओम महेंद्र कुंबरे ५६ किलो वजन गटात सह‌भाग मिळवले सुवर्णपदक विजेत्या २ खेळाडूंची भारतीय बॉक्सिंग संघटनेमार्फत नॅशनल बॉक्सिंग अकॅडमी रोहतूक हरियाणा येथे होणाऱ्या अंडर १७ ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. संघासोबत निखिल इंगळे यांनी प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले.

या बॉक्सिंग खेळाडू च्या कामगिरी मुळे संपूर्ण गडचिरोली चे नाव लौकिक केले, खेळाडूंनी बॉक्सिंग क्षेत्र निवडून त्यात पराक्रम करून आपल्या जिल्ह्याचे व गडचिरोली शहराचे नाव लौकिक केले. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक व आई-वडील यांना दिले.

वरील सर्व खेळाडू गडचिरोली बॉक्सिंग केंद्राचे नियमित खेळाडू असून यांना बॉक्सिंग प्रशिक्षक पंकज महावी यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीब‌द्द‌ल गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे डॉ. मिलिंद रामजी नरोटे, उपाध्यक्ष जगदीश मस्के, अनिल तिडके, अरडकर मॅडम, सचिव यशवंत कुरुडकर, महेश निलेकार, संतोष गैंगवार, संजय मानकर, प्रवीण मेश्राम, रजत देशमुख, पारस राऊत आदी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button