जाहिरात
आपला जिल्हा

लोकनेते बाबुरावजी मडावी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त नवोदित आदिवासी साहित्य परिषद गडचिरोलीत २८ नोव्हेंबर रोजी आयोजन

Spread the love

लोकशाही न्युज,​गडचिरोली (दि. २४ नोव्हेंबर २०२६)

लोकनेते आदिवासीरत्न बाबुरावजी मडावी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त एकदिवसीय नवोदित आदिवासी साहित्य परिषद (संमेलन) चे आयोजन येत्या शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. गडचिरोली (महाराष्ट्र) येथील सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, एल.आय.सी. रोड, आय.टी.आय. चौक येथे हे संमेलन पार पडणार असून, या माध्यमातून बाबुरावजी मडावी यांचे सामाजिक, साहित्यिक, राजकीय व लोकउपयोगी योगदान उलगडण्यात येणार आहे. या परिषदेचे आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि वीर नारायण सिंह उईके विकास समिती, ब्रह्मपुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

​या संमेलनाच्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेला कुसुम अलाम, डॉ. प्रवीण किलनाके, प्रा. अनिल होळी, निशा गेडाम, मंजू आत्राम, आशा वेलादी, प्रमिला रामटेक, सुनीता उसेंडी आणि प्रियदर्शन मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सत्रांची रूपरेषा
​या एकदिवसीय साहित्य परिषदेचे नियोजन विविध सत्रांमध्ये विभागण्यात आले आहे:
​ग्रंथ दिंडी: सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत.
​उद्घाटन सत्र: सकाळी ११:०० ते २:०० वाजेपर्यंत.
​उद्घाटक: मा. डॉ. नामदेव किरसान (खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र).
​सह-उद्घाटक: मा. डॉ. मिलिंद नरोटे (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र).
​संमेलनाध्यक्ष: मा. प्रा. डॉ. सखाराम डाखरे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई, जि. पालघर).
​बीजभाषक: मा. कुसुमताई अलाम (ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक).
​यासोबतच विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी आणि स्वागतपर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​सत्र दुसरे (चर्चासत्रे):
​विषय १: लोकनेते बाबुरावजी मडावी यांचे सामाजिक, साहित्यिक, राजकीय व लोकउपयोगी योगदान (अध्यक्ष: मा. डॉ. संजय लोहकरे).
​विषय २: आदिवासींच्या ताम्रशोध होणाऱ्या बोलीभाषा, मौखिक साहित्य व संवर्धन व चिकित्सा (प्रमुख वक्ते: मा. प्रा. डॉ. राम वासेकर, मा. नंदकिशोर नेताम, मा. रामदासजी गेडाम, मा. शैलेश गेडाम).

​सत्र तिसरे (कवी संमेलन): सायंकाळी ४:०० ते ६:०० वाजेपर्यंत (अध्यक्ष: मा. डॉ. तिलकांत कुलसंगे, ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर).
​एकदिवसीय नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या या सर्व सत्रांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजक व निमंत्रकांच्या वतीने सर्व बंधू-भगिनींना करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button