जाहिरात
गडचिरोलीविशेष

निर्भय पुरुष बचत गट गडचिरोली स्थापनेला 15 वर्ष पूर्ण.

अध्यक्ष,सचिव यांचे सभासदांकडून कौतुक

Spread the love

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ,थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व ध्येयवादी लोकांनी एकत्र येऊन बचत गटाची स्थापना केली होती,बचत ही काळाची गरज झालेली आहे,
बचत करणे म्हणजेच आर्थिक उन्नती व्हावी व बचतीची सवय लागावी या हेतूने बचत गटाची स्थापना केली,बचत गटाची स्थापना म्हणजे केवळ पैसा गोळा करणे हा मुख्य उद्देश
नसून,सामुदायिक भावना वाढीस लागावी,संघटन कौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन मागील पंधरा वर्षांपासून बचत सुरू केली आहे,
थोड्याफार पैशासाठी लोकांसमोर हात पसरावे लागते,बँकांचे कर्ज मिळत नाही यातून सुटका करून घेण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे यामुळे या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते,या बाबींचा विचार करूनच बचत गटाची स्थापना करण्यात आली ,दर महिन्याला या बचत गटाची मासिक सभा होते, गटाचे सभासद सुद्धा मासिक सभेला आवर्जून हजर असतात, जसे मासिक सभा अहवाल,कॅश बुक नोंदी,सभासदांची हजेरी इत्यादी बाबी व सर्वांसमोर हिशोब लिहिला जातो ही बाब विशेष,,
दरवर्षी सर्व 15 सभासद एकत्र येऊन कोणता न कोणता उपक्रम राबवत असतात जसे की,जसे निर्भय पुरुष बचत गटाची सहल,बचत गटातील सभासदांना चादर व ब्लॅंकेट चे वाटप , सभासदांना लघु कर्ज ,घर बांधकामासाठी कर्ज,वाहन दुरुस्ती साठी कर्ज,खाजगी कामासाठी कर्ज, मोबाईल घेण्यासाठी व मोबाईल दुरुस्तीसाठी कर्ज यासारखे आणखी कृती कार्यक्रम या गटातून राबवले जातात ,या गटाची प्रेरणा घेऊन लांजेडा येथे पुरूष बचत गट कार्यरत आहे.तसेच महिलांचे बचत गट याच तत्वावर काम करत आहे. यापुढेपण गटाचे कार्य वाढत राहणार आहे.
संदीप कांबळे अध्यक्ष, कोमेश कत्रोजवार सचिव म्हणून बचत गटाचा कारभार पाहत आहेत,तर गजानन राऊत, नंदूजी सोनटक्के, आनंदराव दुधबळे , हिरालाल भाजीपाले, देविदास लांजेवार, रवीद्र कत्रोजवार, प्रकाश कमळापूरवार , अनुरथ निलेकार, नथुजी चिमुरकर, मुक्तेश्वर बानबले, किशोर गिरडकर, बाल्या ढलाल, निरणशाह मसराम,,आदी सभासद आवर्जून सभेला हजर होते,,
ही मासिक सभा हनुमान मंदिर (विठ्ठल मंदिर)गुजरी बाजार येथे घेण्यात आली यावेळी गटातील सर्व सभासदांना नाश्ता व चहा ची सोय करण्यात आली,
यापुढे ही हा बचत गट असाच चालू राहील असे मत गटाचे सी.ई.ओ. किशोर भाऊ खोबरागडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button