जाहिरात
गडचिरोलीविशेष

ध्येय प्रेरित पुरुषांनी स्थापन केलेल्या पुरुष बचत गटाच्या स्थापनेला 2 वर्ष पूर्ण,

सभासदात उत्साह

Spread the love

बचत गट ही काळाची गरज आहे,
बचत करणे म्हणजेच आर्थिक उन्नती व्हावी व बचतीची सवय लागावी या हेतूने मागील दोन वर्षांपूर्वी 20 चालक मालकांनी प्रहार पुरुष बचत गटाची स्थापना केली,बचत गटाची स्थापना म्हणजे केवळ पैसा गोळा करणे हा मुख्य उद्देश नसून,सामुदायिक भावना वाढीस लागावी,संघटन कौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन मागील दोन वर्षांपासून चालक मालकांनी बचत सुरू केली आहे,
थोड्याफार पैशासाठी लोकांसमोर हात पसरावे लागते,बँकांचे कर्ज मिळत नाही यातून सुटका करून घेण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे यामुळे या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते,या बाबींचा विचार करूनच बचत गटाची स्थापना करण्यात आली ,दर महिन्याला या बचत गटाची मासिक सभा होते,व सर्वांसमोर हिशोब लिहिला जातो ही बाब विशेष,,
मासिक सभेला संदीप कांबळे अध्यक्ष, स्वप्नील मने सचिव म्हणून बचत गटाचा कारभार पाहत आहेत,तर, चेतन भजभूजे, गुणाजी सलोटकर,किशोर नंदगीरवार,दिपक खोब्रागडे, भैयाजी आत्राम, ठाकूर बन्सोड,गुरुदेव नैताम,साईनाथ चलाख,प्रकाश सुत्रपवार,आशिष भांडेकर,संदीप बुरांडे,सुनील तामशेठवार, राहील खतीब,देवराव मेश्राम आदी सभासद आवर्जून सभेला हजर होते,,

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button