जाहिरात
ताज्या घडामोडी

गोकुळ नगर येथील श्री गुरुनानक गुरुद्वारात गुरुपर्वाचा उत्साह; नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांची सदिच्छा भेट

Spread the love

लोकशाही न्युज,​गडचिरोली (दि. २४ नोव्हेंबर २०२६)

श्री गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त (गुरुपर्व) शहरातील गोकुळ नगर परिसरातील श्री गुरुनानक गुरुद्वारा येथे भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नगराध्यक्षा ॲड. सौ. प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे आणि नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी गुरुद्वाराला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले व उपस्थितांना गुरुनानक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी तसेच परिसरातील शीख बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. लोकप्रतिनिधींच्या या भेटीबद्दल गुरुद्वारा कमिटीच्या वतीने मान्यवरांचे यथोचित स्वागत करून आभार मानण्यात आले. याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “गोकुळ नगर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या शीख बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. गुरुद्वाराच्या विकासासाठी वैयक्तिक स्तरावर तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि आवश्यक ती सर्व विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जातील.”

​गुरुनानक देवजींचे विचार समाजाला जोडणारे
श्री गुरुनानक देव जी यांनी दिलेला मानवता, समानता, बंधुभाव, निस्वार्थ सेवा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधणारा आहे. त्यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

गुरुपर्वाच्या या सोहळ्याला नगरसेवक सागर निंबोरकर, मंगलसिंग पटवा, सुनीलसिंग पटवा, राजेंद्रसिंग प्रधानी, गुरुमानसिंग, गुरुदेवसिंग प्रधानी यांच्यासह गुरुद्वारा समितीचे सर्व पदाधिकारी, शीख बांधव, भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button