जाहिरात
आपला जिल्हा

अनुप कोहळे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,२ डिसेंबर)

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली च्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान घेण्यात आलेल्या (कथालेखन) स्पर्धेत अनुप वसंत कोहळे मु. राजनगट्टा, ता. चामोर्शी येथील युवक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवाची ही निवड चाचणी असून अनुप कोहळे यांची आता विभागस्तरीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अनुप कोहळे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते २ हजार रुपयाचा धनादेश आणि सन्मान पत्र देऊन देऊन सत्कार करण्यात आला. पुढील स्पर्धा ही विभागीय स्तरावर ५ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येते पार पडणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button