११ लाख इनामी छत्तीसगड महिला नक्षलीचे गडचिरोली एसपी समोर आत्मसमर्पण
एसपी ची पत्रकार परिषदेत माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाना कंटाळून वरिष्ठ माओवादी व जहाल ५८६ नक्षल्यानी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. छत्तीसगड राज्यातील ११ लाख इनाम असलेल्या जहाल नक्षली रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी वय २८ वर्ष रा. ईरुपगटा ता. भोपालपटनम जि. बिजापूर (छ. ग) हिने सुद्धा गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासमोर आज आत्मसमर्पण केले.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत आत्म समर्पित नक्षली रजनी हिला पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा, नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेला कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक, अनुज तारे सहायक पोलीस अधीक्षक,यतीम देशमुख विशेष पोलीस अभियान हे हजर होते.
आत्मसमर्पीत महिला माओवादी सदस्य रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिच्या बद्दल माहिती
¶¶¶¶
दलममधील कार्यकाळ
● माहे ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन २०१० पर्यंत कार्यरत होती.
● सन २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत होती.
●सन २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन २०१५ पर्यंत कार्यरत होती.
● सन २०१५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत.
४ चकमक सहभाग
¶¶¶¶
●सन २०१५ मध्ये मौजा गुंडम जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
●सन २०१७ साली मौजा बेज्जी ते येर्रागुफा मार्गावरील अॅम्ब्युश/चकमकीमध्ये सहभाग. यामध्ये डीआरजी (छ.ग.) चे १२ पोलीस जवान शहिद झाले होते.
●सन २०१८ मध्ये मौजा मारेवाडा जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
●सन २०१९ मध्ये मौजा बोरामज्जी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
१ खुनात प्रत्यक्ष सहभाग
¶¶¶
● सन २०२०-२१ मध्ये मौजा उपराल (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
आत्मसमर्पित होण्याची कारणे ¶¶
दलम मधील वरिष्ठ कॅडर माओवादी सांगतात की चळवळीकरिता व जनतेकरीता पैसे गोळा करावे प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा स्वतः वापरतात जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही. नक्षल मधील जेष्ठ माओवाद्याकडून स्त्रियांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवती चा वापर करून घेतात. दलमध्ये असताना विवाह झाले तरी स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकी दरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात महिला मात्र यात ठार मारल्या जातात. नक्षली दलम मध्ये आरोग्य विषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्या जात नाही.
महाराष्ट्र शासनाने ६ लाख व छत्तीसगड शासनाने ५ लाख असे ११ लाख रुपये रजनी उर्फ कलावती वेळदी हिच्यावर बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून रजनी उर्फ कलावती वेलादी हिला एकूण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
