जाहिरात
सावली

ग्रामीण भागात घरकुलधारकाना रेती उपलब्ध करुन द्या,ग्रा प सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

सावली तालुक्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजना अनेक दिवसापासुन असुन अनेक लोकांना घरकुल मिळाले आहे.पण रेती अभावी घरकुल बाधकामात अळथळा निर्माण झाल्याने अनेक घरकुल धारकाना मोठा त्रास होत आहे.सिमेंट, लोहा, विटा, गिट्टी यांचा भाव ही वाढून आहे त्यामूळे सामान्यांना योजनेच्या पैशातून घर बांधणे कठीण होऊन गेले आहे.घर बांधायचे असेल तर इकडून – तिकडून पैशाची जुळवा जुळव करावी लागते. अशातच रेती मिळणे ही अशक्य झाले असुन आणि समोर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरकुल धारकांना रेती मीळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत असुन अनेक घरकुल धारकाना पाऊसाअभावी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने घरकुल धारकाना पाच ब्रास रेती शासनाच्या जिआर नुसार घरकूल धारकांना उपल्बध करुन द्यावे अशी मागणी ग्रा. प .सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button