थोर समाजसुधारक, कर्मयोगी, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रीयांसह संपूर्ण बहूजन समाजातील वर्गांचे शिक्षणाचे उद्गाते तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना महा अंनिस शाखा गडचिरोली चे वतीने जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी महा अंनिस च्या आरमोरी रोड वरील परिश्रम निवास येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा कार्याध्यक्ष श्री विलास निंबोरकर, माजी जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे जिल्हा प्रधान सचिव श्री विलास पारखी, शहर सांस्कृतिक अभिव्यक्ती प्रमुख श्री हरिदास कोटरंगे, अंनिस सदस्य श्री उपेंद्र रोहनकर आदी उपस्थित होते.
जाहिरात
