ब्रम्हपुरी ग्रा. से. सोसायटीची निवडणूक अविरोध
जिल्हा प्रतिनिधी
संदीप म्हस्के
चिखली :- चिखली तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अटी, तटीची होणारी निवडणूक शेवटी अविरोध झाली.
चिखली तालुक्यातील वाडी-ब्रम्हपुरी येथील ग्रामसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक शेवटच्या क्षणा पर्यंत चुराशिची होणारी निवडणूक अचानक अनपोच झाली.
सुरवातीला असे वाटले अतिशय रंग येणार या निवडणूकीला परंतु एका बाजूला 8 तर दुसऱ्या बाजूला फक्त 4 अशी 12 सदसीय संख्या होती. त्यामुळे 4 सदस्य असणाऱ्यांनी अध्यक्ष / उपाध्यक्ष पदासाठी अर्जंच भरला नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध पार पडली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून रुपराव भगवान जाधव तर उपाध्यक्ष पदी गजानन भगवान अंभोरे यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून दिलीपराव वानखेडे, सौ. निर्मला सुधन्वा वानखेडे, दत्तात्रय नारायण दवंड, भास्करराव वसंतराव अंभोरे, शेख इब्राहिम शेख रसूल, जगदेव महीपत वानखेडे आणि विरुद्ध चार अशी निवडणूक पार पडली.
या निवडणुकीसाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे डॉ. संतोष वानखेडे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, छगनराव वानखेडे, सखाराम काळे, राजेंद्र वानखेडे, सचिन वानखेडे, सुनील वानखेडे, पांडुरंग गुरुजी, शंकराराव वानखेडे, अच्युतराव वानखेडे, विठ्ठलराव वानखेडे, नीळकंठ वानखेडे, गुलाबराव जाधव, रामदास काळे, शेख साबीर भाई, शेख रशीद भाई, स्वप्नील वानखेडे, आंबादास वानखेडे, अशोकराव अंभोरे, बबनराव अंभोरे, राघोजी पाटील, वसंतराव अंभोरे पंजाबराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनांकरराव अंभोरे आदिनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला.
या निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सचिव टी. ए. सय्यद यांनी काम पहिले.