जाहिरात
ताज्या घडामोडी

५ जुलै ला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गडचिरोलीत येणार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली ( दि,२० जून)

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शिलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे दि.१० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती. त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.

त्याच अनुषंगाने खासदार अशोक नेते यांच्या मागणीनुसार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हया ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार अशी माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिली.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत,अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button