गडचिरोली : भाजपाकडून प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचा शहरात प्रचाराचा झंझावात
एकतर्फी विजयाची खात्री

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२३ नोव्हेंबर)
गडचिरोली नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना उमेदवारी दिली. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यापासून गडचिरोली शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारासह प्रचारासाठी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी स्थानिक रहिवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन अडचणींची माहिती जाणून घेत आहेत.
नागरिकांनी आपल्या गरजा आणि समस्या स्पष्ट करत स्वच्छ व सुबक शहर, मूलभूत सेवांची गुणवत्ता आणि विकासाचे सातत्य याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. भेटीदरम्यान अनेक रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांबाबत सुचना मांडल्या.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या या घरभेटी उपक्रमामुळे प्रभागातील प्रत्यक्ष गरजा, नागरिकांचे अपेक्षांचे बदलते स्वरूप आणि विकासासंबंधी महत्त्वाचे मुद्दे अधिक स्पष्ट झाले असल्याचे स्थानिक निरीक्षकांचे मत आहे.
गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या चुरशीत विरोधक कमजोर असल्याने आपलाच विजय असल्याची खात्री भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना आहे.
