जाहिरात
राजकीय

गडचिरोली : प्रभाग क्र.२ अ अनु. जमाती प्रवर्ग चे शिवसेना उमेदवार पवन राघोजी गेडाम चर्चेत

उमेदवाराला विजयाची खात्री

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२३ नोव्हेंबर)

नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडी कडून गडचिरोली प्रभाग क्र.२ अ अनु. जमाती प्रवर्ग मधुन उमेदवारी मिळालेल्या पवन राघोजी गेडाम यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रचारमोहीमेचा वेग वाढला असून प्रभागांमधून मिळणारा प्रतिसाद हा उमेदवारा साठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.त्या प्रभागातून उमेदवार पवन राघोजी गेडाम यांना विजयाची खात्री आहे. निवडणुकीच्या रिंगणात त्यांना मशाल हे बोधचिन्ह आहे.

प्रभागातील स्थानिक नागरिक, महिला बचतगट, युवक संघटना आणि व्यापारी वर्ग यांच्यात उमेदवार पवन राघोजी गेडाम यांना भरघोस पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छ पाणीपुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण यावर आम्ही ठोस काम करूनच दाखवणार असा विश्वास उमेदवार पवन राघोजी गेडाम यांनी नुकत्याच घेतलेल्या प्रभागातील सभेत देत आहेत. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रभागातून विजय आपलाच असल्याची खात्री उमेदवार पवन राघोजी गेडाम यांना आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button