१५ नोव्हेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडचिरोलीत
भाजपा चे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ करणार सभा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ नोव्हेंबर)
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरूष नितीन गडकरी यांची जाहीर सभा महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय आष्टी जिल्हा गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री विकासपुरूष नितीन गडकरी आष्टी येधिल कार्यक्रमाला १५ नोव्हेंबरला उपस्थित राहणार आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयाने केले आहे.
