जाहिरात
दैनंदिन बातम्या

शेतकऱ्यांचे विज जोडणी साठी ठिय्या आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ जुलै)

गडचिरोली तालुक्यातील व जेप्रा गावातील शेतकरी मागील २ ते ३ वर्षापूर्वी विद्युत कनेक्शन डिमांड भरणा केली पण त्या शेतकऱ्यांची विद्युत जोडणी महावितरण कंपनी ने केली नसल्याने संतप्त झालेले शेतकरी आज ६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयामुळे ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

गडचिरोली कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी ३०-४० वेळा ये-जा केले. परंतू या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली, सदर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न झाल्याने त्यांना नापिकीचा सामना करावा लागणार असल्याची वेळ पण येणार असल्याने शेतकऱ्यांनी म.रा.वि.वि. कंपनी ला जवाबदार धरून गडचिरोली कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.

सदर आंदोलनाची दखल कार्यालयाने न घेतल्यास दि, ११ जुलै २०२३ रोजी कार्यालयाच्या समोर सदर शेतकरी घंटानाद आंदोलन करतील अशी सूचना कार्यालयाला यापूर्वीच देण्यात आल्याची माहिती आहे.

ठिय्या आंदोलनाचे पांडुरंग देशमुख,राज गडपायले,प्रभाकर लेनगुरे,मारोती मोहूर्ले,नामदेव चलाख,प्रकाश गावतुरे,तुळशीराम गावतुरे,आशिष नक्षीने,नीलकंठ संदोकर,आकाशमत्तामी,मुरलीधर धकाते,पुंडलिक चुदरी, ज्ञानेश्वर वाडणकर, सुरेश भांडेकर इत्यादी शेतकरी आपली वीज जोडणी करिता आंदोलन करीत आहेत.

योगाजी कुळवे
जिल्हा अध्यक्ष
अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य
¶¶¶
सदर शेतकऱ्याच्या आंदोलनास मी जाहीर पाठिंबा दर्शवतो व शेतकऱ्यांची वीज जोडणीची मागणी पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी राहीन अशी लोकशाही न्यूज ला प्रतिक्रिया दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button