वांगेतुरी येथे अवघ्या २४ तासात नवीन पोलीस स्टेशन उभा

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि,२१नोव्हेंबर)
पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील,पोलीस अधीक्षक नीलोत्पल व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे अनावरण
एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या वांगेतुरी या गावात पोलीस दलाने अवघ्या २४ तासात पोलीस स्टेशनची स्थापना करून नक्षलवादी कारवायांवर नजर ठेवणार आहे. १००० सी –६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम व ५०० विशेष पोलीस अधिकारी / नवनियुक्त पोलीस जवान व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन आहे.
गडचिरोली पोलीस दलाने २० नोव्हेंबर रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत वांगेतुरी या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली.
सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ४ पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसांत पोस्ट उभारणी करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली.
सदर पोलीस ठाण्यात इतके अधिकारी व कर्मचारी राहणार कार्यरत
¶¶¶
पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ४ अधिकारी व ६३ अंमलदार, एसआरपीएफचे १ अधिकारी व ४२ अंमलदार तसेच सीआरपीएफचे १९१ बटालियनचे १ असिस्टंट कमांडन्ट व १ जी कंपनी तसेच १ अधिकाऱ्यासह १ यंग प्लाटुन तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशनच्या उभारणीनिमित्त गावकऱ्यांना साहित्य वाटप
¶¶¶
कार्यक्रमादरम्यान वांगेतुरी येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सुट,नऊवारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, टि-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकेट्स, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतीदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरीकांनी संतोष व्यक्त केला आहे.
निलोत्पाल
पोलीस अधीक्षक गडचिरोली.
¶¶¶
ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होवून त्यांच्या भरकटलेल्या क्रांतीला बळी पडू नये व नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाचे सर्वागीण विकासामध्ये महत्वाची भूमीका बजावेल.
सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव बल १९१ बटालियनचे कमान्डंट सत्यप्रकाश,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस व पोस्टे वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकार महेश विधाते हे उपस्थित होते.
