विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करा
जिल्हाधिकाऱ्यांना दिले वृतपत्र विक्रेत्यांनी निवेदन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१० ऑक्टोबर २०२६)
स्वतंत्र वृतपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी या प्रमुख मागणीसह वृतपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात यावे म्हणून आज 9 ऑक्टोबर ला संपुर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेच्या पुढाकाराने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुसंघाने आज गडचिरोलीत सुद्धा वृतपत्र विक्रेता संघटनेने मोर्च्याचे आयोजन केले होते. मोर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर संघटनेकडून काही वेळ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय वानखेडे यांना निवेदन देऊन मोर्च्याचे समारोप करण्यात आले.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य तथा गडचिरोली संघटनेचे उपाध्यक्ष राजेन्द्र गव्हारे, सचिव लोमेश बांबोळे, राज्य कार्यकारणी सदस्य तथा संघटनचे कार्याध्यक्ष संजय आकरे, सहसचीव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख संदीप आकरे, पुरषोत्तम रोळे, देवेंद्र बारापात्रे, आकाश वैरागडे, उमेश सोनटक्के आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष गव्हारे म्हणाले 10 ऑक्टोबर 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी वृतपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा तर केली, परंतु त्या मंडळाची अंमलबजावणी अजून पर्यंत केलेली नाही आहे. आणि जो पर्यंत या कल्याणकारी मंडळाचे काम सुरू करून या मंडळामार्फत वृतपत्र विक्रेत्यांना आरोग्याच्या सुविधा, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, पेंशन योजना, घरकुल योजना, स्टॉलसाठी जागा, प्रवासात सवलत या सारख्या मागण्यांचा त्यात समावेश होणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटना तसेच राज्यातील सर्व वृतपत्र विक्रेता बांधव असेच आंदोलन समोरही करीत राहतील आणि यापेक्षाही जास्त तिव्र आंदोलन राज्यातील वृतपत्र विक्रेत्यांकडून केले जाईल.
