गडचिरोली : शिवसेना जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२१ ऑगस्ट २०२६)
गडचिरोली शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रम खालीलप्रमाणे
!!
सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे वृक्षारोपण करण्यात येत आहे.
दुपारी १२ वाजता महिला रुग्णालय येथे माणूसकीचा घास अंतर्गत अन्नदान करण्यात येणार आहे.
दुपारी १ वाजता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी ३ वाजता चामोर्शी येथे गोशाळेत गोमातेला घास कार्यक्रम होणार आहे.
संद्याकाळी ७ वाजता सांस्कृतिक हॉल गडचिरोली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवासेना सर्व पदाधिकारी व शिवसेनिक यांनी होणाऱ्या वरील सर्व कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी अशी विनंती जिल्हाप्रमुख पवन गेडाम व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
