जाहिरात
ताज्या घडामोडी

अमरावती : हलबा जमातीचे महाचर्चा सत्र संपन्न

पुढील वाटचालीसाठी कृती आराखडा निश्चित

Spread the love

लोकशाही न्युज,अमरावती, (दि . १ जुलै):

राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ, गडचिरोली यांच्या पुढाकाराने तसेच आदिवासी हलबा-हलबी उत्कर्ष मंडळ, अमरावती यांच्या सहकार्याने संत गाडगे महाराज सभागृह, अमरावती येथे “उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार ‘कोष्टी’ हा व्यवसायवाचक शब्द असून, त्या अनुषंगाने हलबा जमातीची पुढील दिशा” या विषयावर राष्ट्रीय महाचर्चा सत्र उत्साहात पार पडले.

या महाचर्चेत केवळ न्यायालयीन निरीक्षणापुरतीच चर्चा मर्यादित न राहता, हलबा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, कायदेशीर आणि संघटनात्मक प्रश्न तसेच भविष्यातील दिशा यावर अभ्यासपूर्ण व सखोल विचारमंथन करण्यात आले. हलबा जमातीच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारा आशावादी मार्ग या चर्चेतून समोर आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक शरद सोनकुसरे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. दीपक केदार, नाशिक येथील ज्येष्ठ अभ्यासक नितीन नागपूरे तसेच राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय धकाते यांचा समावेश होता.

महाचर्चेत नितीन नागपूरे, डॉ. दीपक केदार, कृष्णा चांदेकर (नागपूर), श्याम सोनकुसळे (मुंबई), राजेंद्र नंदनवार (नाशिक), ॲड. प्रशांत राईकवार (अचलपूर), राकेश कुंभारे(मुंबई), प्रशांत सिलेकर(नागपूर), देवराव देवघरे(मुंबई), राजाभाऊ पराते(अमरावती), सुधाकर कोसराबे(कल्याण),राजेंद्र बोकडे(भुसावळ),महादेव कुंभारे आदींनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.

चर्चेनंतर हलबा समाजाच्या भविष्यातील संघटनात्मक वाटचालीसाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. तसेच कार्यकारिणीचा विस्तार करून विविध समित्यांवर सक्रिय कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश कुंभारे यांनी केले, तर विषयाची भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष तथा आयोजक उदय धकाते यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व विजय रणदिवे आणि आभार विजय धार्मिक यांनी केले.

या महाचर्चेला राज्यातील विविध भागांतून हलबा समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला प्रतिनिधी सुचिता धकाते, ज्योती चांदेकर, अश्विनी सहारकर, चंदा हेडाऊ, चित्रा कोहाडे, सौ. राईकवार यांच्यासह १०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व विजय रणदिवे आणि आभार विजय धार्मिक यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button