जाहिरात
आपला जिल्हा

१२ जुलै ला तेली समाजातील गुणवंताचा सत्कार

संताजी सोशल मंडळाचा पुढाकार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २२ जून)

संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १२ जुलै २०२६ ला रोज रविवार दुपारी १२ वाजता संताजी भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी जाहीर झालेल्या १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी ज्यांनी दहावीच्या परीक्षेत ८०% किंवा त्याहून जास्त, बारावीच्या परीक्षेत ७५% किंवा त्याहून जास्त, यूपीएससी एमपीएससी, एमबीबीएस तसेच नवोदय, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी चा सत्कार मान्यवराचे हस्ते प्रमापत्र व शिल्ड देऊन होणार आहे.

तरी आपली गुणपत्रिका मंडळाच्या प्रा. देवानंद कामडी अध्यक्ष ९४२१७३५५१९, विठ्ठल कोठारे सचिव ९४२०१४४९२७, सुरेश भांडेकर सदस्य ९४२२१५४१०५, राजेश ईटनकर, अनिल बालपांडे,रामदास कुणघाडकर,प्रमोद पीपरे. प्रभाकर वासेकर, विष्णु कांबळे, सुरेश निंबोरकर, राजेंद्र भरडकर,सुधाकर लाकडे, महादेव वाघे,चंद्रशेखर किरमे,संतोष चिलबुले यांचे कडे गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत जमा करावी.

तसेच जे विद्यार्थी गरीब होत करू हुशार आर्थिक दृष्ट्या कमकुवत ज्याला समोर जाऊन स्वतःची प्रगती साधायची आहे व समाजाची सेवा करायची आहे. बीपीएल तीन मुलांना प्रत्येकी २१ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात स्व. श्रावण तरारे यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ श्री. प्रमोद तरारे मुंबई तसेच २ विद्यार्थी यांना ऍड खुशीराम जाधवणी मुंबई यांचे तर्फे २१ हजार रुपये देण्यात येणार आहे. अशांनीआपली इन्कम सर्टिफिकेट व गुणपत्रिका दिनांक ३० जून २०२6 पर्यंत सादर करावे यानंतर आलेल्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन प्रा. देवानंद कामडी अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button