जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली :३० जूनला सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज,आरमोरी (दि. २६ जून)

जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्यासाठी डाव्या प्रागतिक पक्षांच्या वतीने आरमोरी येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन व विनाशकारी प्रकल्प आणि जनतेचा आवाज दडपण्यासाठी आणलेला जनसुरक्षा विधेयका विरोधात विद्रोह पुकारत ३० जून रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

 

या समितीचे निमंत्रक म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड तर सदस्य म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी काॅ. अमोल मारकवार, काॅ.डाॅ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे भाई शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे आसपाचे रूषी सहारे तर सल्लागार म्हणून ॲड. जगदिश मेश्राम, ॲड. सोनाली मेश्राम यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला आसपाचे नेते धर्मानंद मेश्राम, भाकपचे काॅ. विनोद झोडगे, राजू केळझरकर, प्रेमचंद चिकराम, सीमा डोंगरे, मो. शरीफ, हाजरा बेगम, मनोज निमगडे,चुन्नीलाल मोटघरे, आपचे महादेव कोपूलवार, पंकज टिचकूले, अमोल मोटघरे, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे, मेघराज भोयर, सुभाष आकलवार, पुरुषोत्तम रामटेके, धनराज दामले, सतिश दुर्गमवार, सुरेंद्र वासनिक, पियुष वाकडे, प्रितेश अंबादे, प्रकाश गेडाम, अक्षय पोरटे, किशोर म्हशाखेत्री, भगिरथ भाकरे, शुभम पोरटे, रमेश मेश्राम, रामदास डोंगरावर, संतोष लांजेवार, अविल पोरटे, संगिता मोटघरे, शुभम पाटील, सुरज ठाकरे, आशिष नेवारे, विजय सुपारे, संजय वाकडे, स्वाती खोब्रागडे यांचेसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button