नेरी येथे श्रीकृष्ण व राधा सजावठ स्पर्धा संपन्न
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित स्पर्धेत 60 मुले 80 मुलींनी घेतला भाग
प्रतिनिधी नेरी। प्रवीण वाघे, दि,२४ ऑगष्ट
श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती नेरी व्दारा आयोजित श्रीकृष्ण सजावट व राधा सजावट स्पर्धा नुकतीच नेरी येथील बाजार चौक येथे आयोजित करण्यात आली होती यात श्रीकृष्ण सजावट स्पर्धेत 60 बालगोपाळानी भाग घेतला होता तर राधा सजावट स्पर्धेत 80 मुलींनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी पने संपन्न झाली रंगबेरंगी आकर्षक वेशभूषा करून स्पर्धकांनी नेरिवासीय जनतेचे लक्ष वेधले या स्पर्धेत विविध आकर्षक पारितोषिक देऊन विजयी मुलामुलींचे तसेच सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्मअष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण सजावट व राधा सजावट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून संजय डोंगरे माजी सिडीसी अध्यक्ष प्रा राम राऊत प्रशांत पिसे मोरेश्वर वासेकर कार्याध्यक्ष म रा संदीप पिसे पिंटू खाटीक मनोहर पिसे रविंद्र पंधरे प्रभाकर पिसे नान्हे सर संदेश पंधरे मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक असे श्रीकृष्ण व राधा सजावट साठी ठेवण्यात आले होते बक्षीस ठेवण्यात आले होते अनेक मान्यवरांकडुन या स्पर्धेला पारितोषिक देण्यात आले यात सर्व स्पर्धकांना नोटबुक वही पेन वितरित करण्यात आले तसेच प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आले मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेच्या यशस्वीते साठी दिलीप शिवरकर, प्रशांत पिसे,अजय पंधरे,हरींचंद्र बांगरे, रवींद्र पंधरे,सुरेश पिसे, श्रीधर पंधरे, शरद पिसे, धनराज पंधरे, सुभाष पिसे, निखिल पिसे, अशोक पिसे, राजू पिसे, उरकुडे सर, संदेश पंधरे, घनश्याम वाघमारे यांनी परिश्रम घेतले बालगोपाळना मिटाई चॉकलेट वितरित करून बक्षीस वितरणाने स्पर्धा कार्यक्रमची सांगता झाली.