एस पी पोलीस संघाची कलेक्टर महसूल संघावर वर मात

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे
सध्या भारत देशात एकदिवसीय विश्वचषकाचा जोर सुरू आहे. अशातच गडचिरोली मुख्यालयी पोलीस ग्राउंड येथे दिपावलीच्या शुभ पर्वावर ११ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी ९ वा पोलीस विभाग गडचिरोली व महसूल विभाग गडचिरोली यांच्यात फ्रेंडली क्रिकेट मैच चे आयोजन करण्यात आले होते.यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात एसपी संघाने कलेक्टर संघावर विजय मिळवला.
एस पी च्या पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात पाच गडाच्या मोबदल्यात १०५ धावांचा विजयी लक्ष जिल्हाधिकारी महसूल संघाला दिला. यात गौरव न्हावृते यांच्या ५६ धावांची अर्धशतकीय खेळी केली.व इतर फलंदाजांनी उत्कृट खेळी करत सोबतच धावांचे योगदान दिले व पोलीस विभागाला विजयासाठी १०५ धावांचे लक्ष दिले.धावांचा पाठलाग करताना पोलिस संघाने मयुर भुजबळ, कुंदन गावडे,किशोर शिंदे यांच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने १४ व्या षटकात विजय प्राप्त केला.
सदरचा क्रिकेट सामना हा पारदर्शक व्हावा यासाठी नागपूर येथील व्हिसीए मैदानावर कार्यरत असलेले प्रशिक्षक व पंच यांना बोलविण्यात आले होते.
या रोमांचक क्रिकेट सामन्यामध्ये ५६ धावा करीत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या गौरव नहावृते यांना सामनावीर पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघातील सर्व खेडाळूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते चषक वितरीत करण्यात आले.
सदर सामन्यादरम्यान उपस्थितांकरीता अल्पोपहार, चहा-पाण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.सदर आयोजीत मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्यामध्ये जिल्हाधिकारी संजय मीना,पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख,उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ ,साहिल झरकर, उपविभागीय अधिकारी गडचिरोली विवेक साळुंखे, नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, तालुका क्रिडा अधिकारी, गडचिरोली भास्कर घटाळे, व्हिसीए स्टेडीयम नागपूर येथील स्टेट पॅनल पंच आशीष बावनकुळे, लेवल ओ कोच प्रशांत भुपाल व सचीन मडावी व गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पत्रकार बंधू हे उपस्थित होते.
संजय मीना,
जिल्हाधिकारी गडचिरोली
¶¶¶¶¶
गडचिरोली जिल्ह्राच्या विकासासाठी गडचिरोली महसूल विभाग तसेच गडचिरोली पोलीस विभाग हे माओवाददृष्ट्या अतीदुर्गम भागात आपले कर्तव्य पार पाडत असतात. याकरीता दोन्ही विभागामध्ये अधिक समन्वय यावा यासाठी मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. विजयी संघाचे अभिनंदन, दोन्ही संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. आम्ही अधिक धावसंख्या उभारण्याची आवश्यकता होती. सामना हरणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नसून सामना कसा खेळला हे महत्वाचे.
नीलोत्पल
पोलीस अधीक्षक, गडचिरोली
¶¶¶
गडचिरोली महसूल विभाग यांच्यासोबत आयोजीत मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्यामध्ये दोन्ही संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. आजचा हा विजय कोणत्या एका संघाचा नसून, खेळाचा विजय आहे. आजचा हा सामना आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय राहिल. दोन्ही विभागामध्ये या सामन्यामुळे अधिक समन्वय साधून गडचिरोली जिल्ह्राच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी निश्चीतच मदत होईल.
