जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : यूपीएससी परिक्षेत ५१४ वी रँक मिळवणाऱ्या रजत वाळके यांचा नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर कडुन सत्कार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ७ मार्च)

नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील रजत सुनील वाळके यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा क्रॅक करत ५१४वा रैंक पटकाविला आहे.
आज नगरपरिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर,नगरसेवक सागर निंबोरकर, तसेच परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि दृढ निश्चय यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार आणि गडचिरोली शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.

रजत यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण जिल्हा मुख्यालयातील प्लॅटिनम जुबली शाळेत, ११ व १२वी शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये तर पदवी नागपुरातील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये झाली. अभ्यासात नेहमीच हुशार असलेल्या रजत यांनी २०१८ मध्ये असिस्टंट कमांडंट पद मिळविले, पण आयएएसच्या ध्येयाने ते सतत तयारीत होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने हे स्वप्न साकार झाले.रजतला दोन बहिणी असुन त्या सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button