जाहिरात
आरोग्य

माऊली हॉस्पिटलच्यावतीने मोफत रोगनिदान आरोग्य शिबीर संपन्न 

हजारो रुग्णांची केली तपासणी

Spread the love

लोकशाही न्युज,चिखली प्रतिनिधी/ मेघा जाधव

किनगावराजा दि. ९ येथील श्री माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जालना येथील वीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न झाले. यावेळी हजारो रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली.
सकाळी ठीक १० वाजता भव्य रोग निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जालना येथील वीरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुहास विघ्ने,डॉ. निता विघ्ने यांच्या हस्ते महा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्धवराव नागरे, डॉ. ज्ञानेश्वर नागरे,डॉ. प्रवीण ससाने,डॉ. कल्पना नागरे, पांडुरंग नागरे, डॉ. नितेश भोजने, डॉ. रोहित दराडे, डॉ. विशाल कदम, डॉ. तृप्ती रणबने, डॉ. शुभम वाघ, रवींद्र नागरे आदींची उपस्थिती होती. आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्ररोग, दंतरोग, स्त्रियांचे आजार, अस्थिरोग, बालरोग, नाक कान घसा तज्ञ, कर्करोग निदान आधी व्याधीग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधाचे वितरण करण्यात आले.

यावेळी सर्वात जास्त डोळ्यांच्या आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती. त्या सर्व रुग्णांना मोफत औषधी तसेच गरज पडल्यास चष्म्याचे मोफत वितरण शिबिराचे आयोजक असलेल्या श्री माऊली हॉस्पिटल चे संचालक डॉ. डॉक्टर ज्ञानेश्वर नागरे यांच्यावतीने करण्यात आले.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराचा किनगाव राजा परिसरातील हजारो रुग्णांनी लाभ घेतला. महादेव सानप, गजानन किंगरे, देवानंद काळुसे, ऋषिकेश जायभाये, ऋषिकेश नागरे, अविनाश जायभाये, ऋषिकेश वाघ, योगेश केकान, अविनाश वाघ, दयानंद दराडे, आतिश वाघ, अक्षय उबाळे आदी आरोग्य सेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button