गडचिरोली : प्रभाग क्र. ५ च्या नगरसेवक सौ.सिमा राहुल कन्नमवार (कोसे) यांची महिला व बालकल्याण सभापती पदी निवड

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२१ जानेवारी)
प्रभाग क्र. ५ अ मधुन भरघोस मताधिक्या ने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक सौ. सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद येथे झालेल्या आज महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
गडचिरोली च्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वाच्या पदावर सौ.सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांची निवड ही त्यांच्या सामाजिक कार्याची, महिलांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची पावती मानली जात आहे. महिला सक्षमीकरण, बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, पोषण व संरक्षण या क्षेत्रांत त्या प्रभावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे महिला व बालकल्याण विभागाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मिळालेल्या पदाला योग्य न्याय देण्याचा आशावाद लोकशाही न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत नवनियुक्त महिला व बालकल्याण सभापती सौ सीमा राहुल कन्नमवार (कोसे) यांनी व्यक्त केला आहे.
